मारिला अफझुल्ल्या पापी..!! 🚩🚩🚩
मारिला अफझुल्ल्या पापी...!
अधर्म आणि बिभत्सतेचा गोळा चालुनी आला..
स्वराज्य-रोपा समूळ उपटण्या घालाया घाला..
भ्रष्टली किती पवित्र क्षेत्रे, भंगविल्या मूर्ती
'मूर्तिभंजक' नावे ज्याची होती अपकीर्ति ..
नवांकूर जे अश्वत्थाला फुटले सह्याद्रीत,
तुडविण्यास त्या असुर आला होता कात्रीत...
अश्वत्थच तो जरी त्यागितो, क्षणभर पानांना
नवांकुरांसह पुन्हा बहरतो, फांद्यांवरूनी नाना..
अमरचि ऐसा अश्वत्थागत आहे धर्मद्रुम,
सह्याद्रीतून पुन्हा प्रकटला होता क्षात्रधर्म..
जरी गळाली होती त्याची पाने भूमिवरी,
तोडावया जमदाड घेऊनी आला होता अरि ..
नव्हते त्याच्या स्वप्नी किंवा मस्तकात आले..
वाट तयाची पहात होती, भूते घेऊनी भाले..
अधर्मी आणिक मदांध अफझल चालुनिया आला..
नाशाच्या अपुल्याच दिशेने, आला चालत आला..
बुद्धी-युक्तीने निमन्त्रिले त्या गाफिल ठेवून..
व्यूह रचोनि कधी न सुटण्या मगरमिठीतून..
रत्नजडित मण्डप सजविला स्वागतास त्यां होता..
क्रूर, कराल नित्य परि ज्याचा स्थायिभाव होता..
आली आली दोन प्रहरची, ती घटिका आली...
नृसिंह पुन्हा अवतरण्याची सुवर्णघटिका आली..
उभा ठाकला बलाढ्य जरीही पुढे म्लेंच्छ असुर..
क्रूर म्हणुनी तो कुख्यात परि, होता बहुत शूर..
धार-धार मग भिडली जेव्हा नजरेसी नजर..
पापात्म्याच्या समोर ठाकला होता साक्षात हर..!
उघडुनी तिसरा नेत्र, शिवास चढला दिव्यावेश...
क्रुपाणिकेचा क्षणात रिपूच्या उदरी झाला प्रवेश..
लोंबू लागली अफझुल्ल्याची देहाबाहेर अन्त्रे..
सप सप सप मग चालू लागली विजयी दिव्यास्त्रे..
'हर हर हर हर महादेव' दुमदुमला जयघोष..
पिऊनी रिपूचे, रक्त जाहला धरणीला तोष..
अफझुल्ल्याचे शीर धाडुनी दिधले राजगडी
मातेच्या पायावर वाहून, प्रतिशोधही पूर्ण करी
राष्ट्रधर्मासवे शिवाने पाळियला पुत्रधर्म..
आचरुनी लीलया उलगडले, धर्माचे वर्म..
दिशा पालटुनी इतिहासाची भगवा रोवियला..
उंच नभी फडकत जोडूनी, धर्माच्या खांबाला..
इतिहासाच्या भाळी रिपुच्या रक्ताने लिहिता..
गोंदुनी अक्षरे, अज्रामर ही, झाली शौर्यगाथा..!!!
( युगपुरूष आणि राष्ट्रपुरूष असे जे आपले राष्ट्रदैवत गोब्राह्मणप्रतिपालक म्लेंच्छक्षयदीक्षित पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या दिव्य चरणी ही शब्दसुमने समर्पित. आजच्याच दिवशी, म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ साली महाराजांनी भारतातील असुरी इस्लामी राजवटीला अफझलखानाचा वध करून मोठा सुरूंग लावला. त्या सुरूंगाचे हादरे संपूर्ण हिंदुस्थानभरच नाही तर भारताबाहेर सुद्धा नुसतेच जाणवले नाहीत तर त्यातून येथील सुल्तानी सत्तेत निर्माण केलेल्या भेगांचे हळू हळू भगदाडात रुपांतर होऊन भगव्या ध्वजाची पताका अटकेपार पोहोचली.! )
हर हर महादेव !!!🚩
वन्दे मातरम् !🚩
~ पङ्कज ( १०.११.२०२२ )
=====卐卐卐=====
वरील ओळींमध्ये अफझुल्ल्याच्या जागी औरंग्या असे झाले होते. तसेच कांही मित्रांना मध्यरात्रीनन्तर, जेव्हा लिहून पूर्ण झाले तेव्हा पाठवले होते. ही चूक सकाळी एका सुहृदाने ध्यानात आणून दिल्यावर बदल केला.
नन्तर असाही विचार येऊन गेला की, जर खरोखरच महाराजांनी औरंग्यालाही असेच मारिले असते तर ? पण,
इतिहासाला माहित नसते जर-तरची भाषा..
तटस्थ, त्याला नसते आशा, आणिक नसे निराशा..
वाटाड्याचे कामच असते, वाटा दाखवणे..
वाटेवरील धोके, आणिक तीर्थे दर्शवणे...
इतिहास तसा, अलिप्त राहून करितो निर्देश..
पाहून त्याला, अपुल्या डोकी पाडाया प्रकाश..
इतिहासाच्या ठायी नसतो, कल्पकतेला थारा...
मुळीच नसतो, तेथे चालत, कल्पनेचा पसारा..
हर हर महादेव !!!🚩
वन्दे मातरम् 🚩🙏🏽
~ पङ्कज 🌷
.jpeg)

Comments
Post a Comment