होमकुण्ड ..!
हिंदूंच्या का नसे मनगटी शिवरायांचे तेज ?
लेखणीस का वाटावी ती, क्रांतीची हो लाज ?
क्रांतीचा परि उदय होतसे अंतःकरणी खोल...
विवेकबुद्धीच्या काठीने, रणी बडविता ढोल..
त्या नादाने सळसळते मग जेधवा रुधिर...
त्या सळसळीने पळू लागती रिपु, सुटूनी धीर..
स्वकीय असो वा असोत परकी, रिपूस ओळखणे..
कळून येवो, हिंदूंना हे कृष्णाचे शिकवणे..
रिपु नोळखिता, मुठी आवळुनी, कसला उपयोग ?
वन्ही कसा मग होई ठिणगीचा, जलाशी येता योग ?
'अंतःकरणाचा ओलावा' ही वाटे जरी संपत्ती..
परी करू शके घात जेधवा, येईल विपत्ती..
ठिणगीला त्या परी जपावे, ओलाव्यापासून..
समयचि येता, तिचा होऊद्या, अनल स्वतःहून ..
पवित्र अग्नी, पेटो मग तो, यज्ञकुंडांमाजी..
झणी भक्षी जो, जे जे पडते, हव्य तयामाजी..
असा पेटुदे मंत्राग्नी हा, हिंदूंच्या अंतःकरणी..
नाश करील जो, भक्षुनी रिपुला, क्षणात धर्मरणी..
हर हर महाऽऽऽऽऽऽदेव !!! 🔱🚩
वन्दे मातरम् 🚩
( टीप - 'सर्वत्र पेटुदे हा वन्ही...' फक्त तो वणवा नसूदे, म्हणून यज्ञकुंडांची उपमा दिली आहे...यज्ञामागे एक भूमिका असते, तप असते, त्याग असतो, पावित्र्य असते आणि यज्ञकुण्डाची मर्यादा तर असतेच असते. )
_शब्दसेवा ~ पङ्कज ( ०१.१२.२२ )_


.jpeg)
Comments
Post a Comment