रे रे चातक..!
रे रे चातक ! सावधान मनसा मित्र क्षणं श्रूयताम् ।
अम्बोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेअपि नैतादृशा: ।।
केचिद् वृष्टिभिः आद्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा ।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं बचः ।।
( नीतिशतकम् )
मराठी भावानुवाद ~
रे रे चातक ! सावधान मन करुनी, ऐक जरा क्षणभरे ।
मेघांचे बहु संघ असती गगनी, सर्वच ना एकसरे ।।
काही त्यातील वृष्टीने भिजविती, काही गर्जती वृथा ।
जे जे दिसती तयांच्या पुढती रे, नको याचणे सर्वथा ।।
~ शब्दसेवा - पङ्कज. ☘️
( मार्गशीर्ष कृ. पंचमी. शके. १९४४ )
( छायाचित्र - चातक पक्षी. सौजन्य - इंटरनेट )
.jpeg)

.jpeg)
सुन्दरम् !!
ReplyDelete