नीतिशतकम् - भावानुवाद -४

 


प्रसह्य मणिमुद्धरेन्‍मकरवक्‍त्रदन्‍ष्‍ट्रान्‍तरात् । 

समुद्रमपि संतरेत् प्रचलदूर्मिमाला  कुलम् ।

भुजंगमपि कोपितं शिरसि पुष्‍पवद्धारयेत् । 

न तु प्रतिनिविष्‍टमूर्खजन चित्‍तमाराधयेत् ।।४।। 

( - नीतिशतकम् )


~ भावानुवाद -


मगरीच्या दंतातिल मोती, सहजचि असे काढणे ।

लाटा विशाल उसळत असतां, सोपे समुद्रात पोहणे ।

क्रुद्ध भुजंगास सुमनवत् सहज ते स्वशिरी वाहणे ।

परी दुराग्रही मूर्खास त्या, असंभवचि समजावणे ।।


वन्दे मातरम् !🚩

_~ पङ्कज 🪷_

_( मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी, शके १९४४ )_

( छायाचित्र - गोव्यातील मांडवीतीरावरील एक बेट, चोडण या आमच्या गावाहून, मांडवी नदीच्या किनारी एक सुर्यास्त ) 

Comments

Popular Posts