नीतिशतकम् - भावानुवाद -३



अज्ञ: सुखमाराध्‍य: सुखतरमाराध्‍यते विशेषज्ञ:। 

ज्ञानलवदुर्विदग्‍धं ब्रह्मापि तं नरं न रंजयति ॥३॥

( - नीतिशतकम् )


भावानुवाद ~


अज्ञाची अनुकूलता मिळविणे असे सुखे शक्य ते ।

विशेषज्ञांही समजावणे असे, त्याहूनही सुलभ ते ।


ज्ञानाचा परि लेशही करि झणी, मदांध मूर्खास ज्या ।

ऐशा गर्विष्ठ नरा न रंजवू शके, ब्रह्मदेवही खास, त्या ।


~ पङ्कज 🪷

_( मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी, शके १९४४ )_


( छायाचित्र - कर्जत येथील एका जलाशयातील वनस्पतीचे माझ्या कॅमेरा मधून टिपलेले छायाचित्र )

Comments

Popular Posts