आलिया भोगासी
आलिया भोगासी असावी चादर ...
पांघरुनिया सुस्त झोपी जावे ...
भोगांचे ते काय, येतील जातील ...
परि आलेल्या झोपेस घालवू नये ..!
झोपी जाता नुरे वास्तवाचे भान ..
स्वप्नी विश्व निर्माण करितो स्वये ..
विश्वामाजी होऊ अभिषिक्त नृप ..
आणिक चौफेर राज्य करू ...
राज्य असे की ज्यां नसे दुःख कांही..
समाधानी सर्व, जन होती ...
ना कोणी राहील तृषार्त आणिक ..
क्षुधाग्नी न कोणास भक्षी कदा ..
पंथांची ती नावे असूदे कितीही ...
स्वधर्माच्याच सूती गुंफति सारे ...
जी जी का धरावी इच्छा मनी काही...
ती ती जाता झोपी, पूर्ण होईल ...!
😴😴😴
.png)

.jpeg)
जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न समर्थ रामदास स्वामींना पडलाच कसा?
ReplyDeleteलंगोट बंद राहून आयुष्य भर वणवण केली, हनुमान मंदिरं, मठ, व्यायाम शाळेच्या पटांगणात सूर्य नमस्कार घालायचा धाक दाखवला. घसडून शुद्धलेखन करायला लावले...
मस्त घोरासुराचे आख्यान लावून ताणून देण्यात काय स्वर्ग सूख आहे...
तुम क्या जानो भाई...!
भार्या ती पुढ्यात उभी दिसे
ReplyDeleteहाती केरसुणी तिच्या असे
वटारून डोळे मला पाहतसे
प्रश्न हा की पंखे कोण पुसे?