नृपनीति..!!

 


गुजरात निवडणुकीत मोदीजींना प्रचंड यश...!!! निवडणुक राज्यस्तरीय असली तर काय झाले, फोटो मात्र विद्यमान प्रधानमंत्र्यांचाच हवा...!!! ही सुटलेली हवा बरेच कांही वाहून नेते आहे आणि बरेच काही सांगून जातेही आहे...! 


एक संस्कृत सुभाषित आठवले -


सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च

हिंस्त्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या ।

नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च

वेश्याङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा ।।



सुभाषिताचा स्वैर भावानुवाद ~ 


सत्यवती वा दुर्विनीता वा असे असत्यवादिनी..

हिंस्र कधी वा कधी दयाळू कधी प्रियभाषिणी..

अर्थातुर ती कधी चतुर अन् असे मिष्टभाषिणी..

संपत्तीव्यय नित्य करी ती विपुलधनसंग्रहिणी..


अनेकरूपे, अनेक अङ्गे दृग्गोचर जरी असती..

गुप्त अशी परि अगणित रूपे खचित संभवती..

गुणांनी या लिप्त, तिचा जरी भद्र असे सङ्ग ना..

नृपनीति ही असे अशी, जशी अभद्र वाराङ्गना..


उभयांमध्ये एक असे ती दुर्दैवी हो माय .. 

भाळावरल्या दैवापुढे न चालतसे प्रत्यवाय..

दोषांचे जरी संकुल असले वसत तिच्या ठायी...

नसे तयेचा सज्जनांस परि उपद्रव तो कांही..


नृपनीति परि असे भयंकर, कुरूप ती असते.. 

परि स्वतःचे रूप झाकुनी, कृत्रिम ती हसते..

नाही कुणां ती सोडत, कैसी नसे लाज तिजला..

टाळूवरील लोण्याचाही असे हव्यास तिजला..


 ~ पङ्कज

(०८.१२.२२)

#सत्यम्ब्रूयात

Comments

Popular Posts