ऋतुचक्र..



सर्व ऋतु आपापसात खलबत करत आहेत ..

सर्वांनाच सर्वच सण, साजरे करायचे आहेत ..


वर्षा म्हणते माझ्याशिवाय नाही तुमचे हालत पान ..

एकटा शरद करतो नेहमी फराळ आणि चहापान ..


दिवाळीच्या फराळातील चिवडा, चकली, लाडू..

पाहून तोंडा सुटले पाणी, म्हणते फडशा पाडू..


हेमंत म्हणे मला आवडतो गार गार वारा ..

परि वर्षाला जवळी माझ्या मुळी नको थारा..


ऐकुन असले उद्गार तिचे बहुतेक फिरले माथे..

म्हणते वर्षा, "यंदा येईन भेटण्यास मी त्याते" ..


शिशिरास लागता बातमी, तोही चिंतित झाला..

म्हणे वर्षाची भेट घ्यायची उठाठेव कशाला ?


वसंतासही वाटली काळजी, छत्री त्याची तुटली..

म्हणतो माझ्या येण्यानेच, झाडांना पालवी फुटली..


ग्रीष्माचे अन् वर्षाचे तर, जुनेपुराणे नाते...

पाण्याची तो वाफ बनवुनी, हृदय निवेदी तीते..


ग्रीष्माच्या ऐकुनी मनीचे, द्रविभूत ती होते..

पुन्हा एकदा हर्षभराने, धरा न्हाऊनी निघते..


~ पङ्कज.


( फोटोत तुंगी दुर्ग तसेच पवना नदी दिसत आहे )

Comments

Popular Posts