कार्यसिद्धीचा मंत्र !!!

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।

विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ।।

(श्रीमत् भगवद्गीता : १८.१४)


☘️☘️☘️


मराठी भावानुवाद -


माध्यामाहुनी असे महत्व कर्मात उद्देशाचे

अधिष्ठान असावे धार्मिक आणि असावे साचे


कर्त्याचे परि सुयोग्य असणे खचित असे अनिवार्य

उचित कर्त्याविना सफल न बहुतांश होईल  कार्य


समर्थ कर्त्याच्या हातात उपकरणे उपयुक्त 

उपकरणांचा विनियोग असो श्रेष्ठ प्रणालियुक्त


विविध तथा पृथक् प्रयत्नांनी होईल अनुनाद 

जसा निपुण वाद्यकरांचा लयबद्ध होईल नाद


चारही कारक सिद्धचि होता जे उपरिनिर्दिष्ट

कार्यसिद्धीची असे निश्चिती, दैव जर असे इष्ट


'दैवावरीच आश्रित असणे' असे जयांचा स्वभाव

सम्मोहित होताचि संभवे कार्यसिद्धिचा अभाव


पंचविध, चिरंतन अशी ही कार्यसिद्धीची तत्त्वे

प्रकाश देतील प्रत्येकाला स्थलकालपरत्वे..!


~ भावानुवाद - पंकज. 🪷

(२९.०१.२३ )

Comments

Popular Posts