सहस्रदा नमन माझे, त्या विनायकाला..!
किशोरवयीच जयाने, फुंकिले रणशिङ्गास..
तारुण्यी हादरवीले, इंग्रजी सिंहासनास..
परकीय कापडांच्या, भिडविल्या गगनी ज्वाला..
सहस्रदा नमन माझे, त्या विनायकाला..
तारूण्यीच जाहला जो, असुरांस हाडवैरी..
मरणांतक यातनांना, लादले तयावरी जरी..
अग्निदिव्यातूनही, जो लीलया पार झाला..
सहस्रदा नमन माझे, त्या विनायकाला..
'अस्पृश्य कुणा न मानावे', हा मन्त्र चेतवून..
मानवता हीच प्रमाण, सकलांस दिली पटवून..
मानिले पूज्य सर्वांच्या, हृदयस्थ ईश्वराला..
सहस्रदा नमन माझे, त्या विनायकाला..
स्वातन्त्रदेवीच्या यज्ञी सर्वस्व समर्पाया..
हिन्दूंच्या उत्थानास्तव, अखण्ड झिजली काया..
शास्त्राधिष्ठीत अखण्ड हिन्दू, अपेक्षीत ज्याला..
सहस्रदा नमन माझे, त्या विनायकाला..
मनगटी जयाच्या काली, शारदा लेखणीतून..
अस्तित्व दाखवीते, अतिदिव्य कृतीतून..
नरकातही वरते, मृदू कवित्व जयाला..
सहस्रदा नमन माझे, त्या विनायकाला..
आहुती महायज्ञात, सहकुटुम्ब वहायाला..
जाताना कधी न सुटला, ज्यां कंप पायाला..
व्यापिले चिरन्तन ज्याने, हिंदूंच्या हृदयाला..
सहस्रदा नमन माझे, त्या विनायकाला..
~_शब्दासेवा - पङ्कज_ 🪷


.jpeg)
Comments
Post a Comment