आले गांधी, गेले गांधी
आले गांधी, गेले गांधी
आले गांधी गेले गांधी, परी उरले नोटांवरती..
रुपये पाच वा असो पाचशे, हसती ते त्यावरती..
आले गांधी, गेले गांधी, उरले भिंतीवरती...
कोर्ट असो वा असो कचेरी, दिसती खुंटीवरती..
आले गांधी, गेली गांधी, उरले घोषणांत..
सत्य, अहिंसा विसरलेल्या राजकारणांत..
आले गांधी, गेले गांधी, उरले अभ्यासात...
शाळेमधील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात..
आले गांधी, गेले गांधी, उरले गांधीवादी..
असे जेथ गांधीवादाची, नाममात्र उपाधी..
जे गांधींना दूषण देती , तेचि क्षात्रां त्यजिती..
शब्दांचेही न खड्ग चालवती, घोर असूरांवरती...
~ पङ्कज
( ३०.०१.२३ )


.jpeg)
Comments
Post a Comment