उंच उभारू गुढी !!!

 


चैत्राचा महिना आला, आली नूतन पालवी ...

नवचेतना जागवीत आणी चित्तास टवटवी..


नभी उगवता रवी जेधवा नवकिरणे नाचती

हृदयातील क्षितिजावर होवो अवीट रंगसंगती


आज आपुले सहस्त्र बाहू सुस्वर तालात..

मिळोनी फडकू नित्य पताका उंच गगनात..


असे वारसा रामप्रभूंच्या आद्य धर्मतेचा

वसे अंतरी वसा निरंतर देवी सीतेचा


कितेक राक्षस आले चालून भारत भूमीवर

त्यांसी वधाया अवतरले झणी अनेक अवतार..


स्वये रक्षिण्या धर्म सांडिले स्वजनांनी रक्त..

मातृभूमीला दैत्यांपासुनी करावया मुक्त..


जरी जाहले, पुढेही होतील धर्मावर वार...

आणि संस्कृती मलीन होते जरी वारंवार..


परि आमुच्या मनी राहूदे धर्माग्नी धगधगत..

सकळ काळिमा झणी होऊदे समूळची दग्ध 


धर्म, ज्ञान, अस्मिता, तेज हे बुरूज नटती गडी ..

तिथे उभारू आनंदाने गगनचुंबी ही गुढी..


~ शब्दसेवा - पङ्कज 

(चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९४५)

Comments

Popular Posts