जय श्री राम ।
🚩 ॥ श्रीराम ॥ 🚩
आज रामजन्माचा सण, करू रामाचे स्मरण..
अंतःस्थ रणभूमीवर होऊद्या पुनश्च रामायण..
राम वंदू जनतेचा, राम वंदू जानकीचा..
राम वंदू भरताचा, परमप्रिय भ्राता ..
राम वंदू वाल्मिकीचा, राम विश्वामित्राचा..
राम वंदू शबरीचा, सकलांचा त्राता ..
राम वंदू मारुतीचा, राम वंदू लक्ष्मणाचा..
राम वंदू अंगदाचा, शक्तीप्रदाता..
राम वंदू दशरथाचा, राम वंदू कौसल्येचा..
राम वंदू कैकेईचा, धर्माचा धाता..
राम वंदू बिभीषणाचा, राम वंदू सुग्रीवाचा..
राम जांबुवंताचा, गतिर्भर्ता..
राम वंदू नाविकाचा, राम वंदू जटायूचा..
राम वंदू सकलांचा, मुक्तीप्रदाता ..
असुरांचे निर्दालन, धर्माचे उज्जीवन..
सत्याचे करीं रक्षण, राम विधाता..
जावू रामासी शरण, होवो वृत्तींचे हरण..
लागो तयाचे चरण, नित्य सर्वांच्या माथा..
॥ हरि ॐ ॥
शब्दसेवा ~ पङ्कज 🌷
(श्री रामनवमी, विक्रम संवत २०८०)


.jpeg)
Comments
Post a Comment