उडणारा हत्ती .. !

 


हिंदू समाजातील जातिसंस्था ( याला चातुर्वर्ण्य असा शब्द समानार्थी म्हणून हळूच वापरला जातो कांही 'सङ्घ'टनांकडून ) हेच सकल दुःख्यांचे मूळ आहे असे म्हणत हिंदू समाजामध्ये जहाल पण हळुवार वीष ( slow poisoning ) कालवण्याचे काम जे होत आलेले आहे त्यामागील सत्यशोधन करणे हे प्रत्येकाचेच दायित्व आहेच तसेच सर्वच प्रवृत्तींबद्दल 'अनिरोधेन' अशी भूमिका ठेवण्याचा आव आणत हिंदू समाजाला क्षात्रहीन आणि निष्प्रभ करण्याचे कार्यक्रम जे चालताना दिसतात त्या पार्श्वभूमिवर सहज सुचलेले एक छोटेसे विडंबन ...


🍃


जाती-पंथ सारेच विसरता हिंदू एक होईल ... 

एकसङ्घची हिंदू मग तो हिंदुराष्ट्र घडवील .. 


हिंदुराष्ट्र घडताची नसे मग कुणी कुणालाही परका ... 

फणस सुद्धा नसेल कापा, असेल तो केवळ बरका  ...


फणसांच्या त्या अंगावरती एकरंगी फुले असतील ...

सर्व फुले मग रोज रोज ती नव्या दमाने उमलतील ..


सर्व फुलांना येईल मग तो एकसारखा सुवास..

सर्व फळांना हेवा आणिल फणसाचा हा प्रवास..


फळेच सारी मग ठरवीती होऊ फणसच आपण ... 

त्यागुनी सारे वर्ण आणिक सोडूनी स्वये वेगळेपण ..


हे बंधूंनो, कशास करिता चिन्ता उत्थानाची .. 

मस्त राहुया चिलीम भरूनी समता-समरसतेची ..


( वरील ओळींमध्ये 'वदतो व्याघात' चा प्रयोग करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. कांही सूचना असल्यास हक्काने सांगावे. )


~ पङ्कज 🪷

(२४.०९.२३)

Comments

Popular Posts