वाळवी !
वाळवी ..!
वाळवी म्हणजे वाळवी म्हणजे वाळवीच असते ...
न कुणी अपुला परका, तिला उजवी डावी नसते ..
कधी हिरवा, निळा, पांढरा तर कधी भगव्यात ती लपते ...
क्वचितच ती दृष्टीगोचर, एरव्ही आतल्या आतच पोखरते ...
पोखरताना मात्र ती एक सूक्ष्म आवाज नक्की करते..
वेगवेगळ्या गोंगाटात मात्र तिचे विनासायास फावते..
वैचारिक वा सामाजिक, कधी नात्यांमध्येही असते..
बहुरूपी, बहुगुणी, बहुरंगी ती, कैसे मी वर्णू तीते ?
वाळवी लहान असली तरी, सदैव सङ्घटीत असते ..
अन् सङ्ख्येच्या बळावर, यश तिच्या मुठीत असते ..
कलियुगी जी सुखाने रमते, अन् हळुवार ती पोखरते ..
अविद्या हीचि परी माता जयेची, अन् विद्येने ती मरते ..
~ शब्दसेवा ~ पङ्कज 🪷
( 'कमलदल')
(२७.०९.२३)


.jpeg)
Comments
Post a Comment