विजयादशमीच्या सुमुहूर्ती !

 

( प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमंत, बिभीषण हे सर्वच विविध भूमिकेत आपले आदर्श आहेत याचे आपल्यास स्मरण राहो )


विजयादशमीच्या सुमुहूर्ती !


विजयादशमीच्या सुमुहूर्ती, संकल्प स्मरू आपण सारे

स्वधर्माधिष्ठित शस्त्रपुजेतून, सत्-आदर्शा अनुसरूया रे


शस्त्र असे जे स्वभावगत अन् परिस्थितीगत हाती घेऊ .. 

खड्ग कधी वा कधी लेखणी, परी विवेकासवेच चालवू


जसे जयाचे कर्तव्य असे, जशी जयाची असे धर्मता

सत्वर तत्पर होऊनी रुजवू, कर्तव्याठाई अनुरूपता


देव, देश अन् धर्मासाठी, अंतःकरतील रणावर

हे माते तव कृपा असुदे, विजया आसुरी प्रवृत्तींवर


~ शब्दसेवा - पङ्कज 🌷

( विजयादशमी, आश्विन शुद्ध. १०, विक्रम संवत् २०८० )

Comments

Popular Posts