अयोध्यानिवासी प्रभु श्रीराम

 


अयोध्यानिवासी प्रभू श्रीराम 🙏🏽


अयोध्या ते मन, तनू तीर्थक्षेत्र..

क्षेत्रज्ञ तो राम, व्यापिला सर्वत्र..


आत्मारामी चित्त, लाचावता साचे

वाहिले अक्षत मन पायी त्याचे..


आसुरी वृत्तींचा होता सैल पाश..

मंदिरी गवसता जाणीव कळस..


देहचि मंदिर, त्यात आत्मा राम..

भेटताचि जीव, होतो पूर्णकाम..


ऐसी घडो भेट, देहाच्या मंदिरी..

करो पूर्ण कृपा, सावळा श्रीहरी 🙏🏽


🪷 ~ ( ०१.०१.२४ )


( टीप - इथे अयोध्या हा शब्द विशेषण या अर्थाने आला आहे. अयोध्या म्हणजे अजिंक्य. मन जेव्हा अजिंक्य होते, म्हणजेच ते कुठल्याही विकाराने वश होत नाही, प्रभुश्रीरामचरणीच लाचावलेले आहे अशी स्थिती. तसेच मनाला अक्षत असे विशेषणही वापरलेले आहे. अक्षत म्हणजे ज्याची क्षती झालेली नाही असे, अखंड. म्हणजेच जे विभागले गेलेले नाही असे. मग अशी मनाची स्थिती झाली की तेच अयोध्या बनते.  देह हे जे क्षेत्र आहे त्याला मंदिराची उपमा दिली आहे, तसेच त्या देहातील देही जो आत्मा तोच साक्षात प्रभु श्रीराम, म्हणजेच आत्माराम. अनंतकोटी ब्रह्मांडनायक जो राम, जो चराचरामध्ये नटला आहे तोच आपल्यातही आत्मस्वरूपाच्या रूपाने अवस्थित आहे असे भारतीय अध्यात्मशास्त्र जे सांगते तीच समस्त संतांची अनुभूतीही आहे.)


जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🏽

Comments

Popular Posts