'लोटस' नावाचे घड्याळ
माझा एका सुहृदाशी झालेला हा पद्यमय संवाद ... गंमत म्हणून देत आहे 😃😃
🪷
मी वदलो,
माझ्या नावाचा अर्थच 'कमळ'
मलाच याची वाटे लाज ..
नावाला सुद्धा कमळाचे गुण,
नसती राजकीय कमळात आज ..
ती वदली,
इतके का तुज नैराश्य यावे
इतके का ते मनावर घ्यावे
खावे प्यावे, मजेत राहावे ..
झाले गेले गंगेत सोडावे ..
मी वदलो,
नैराश्य आम्हा कसे शिवेल ?
आम्हास श्रीकृष्णाचा वारसा ..
तिक्ष्ण शब्द-सायकांचा,
आम्ही केवळ धरतो आरसा ..
आरसा मात्र नसताना,
कसे दिसेल ते प्रतिबिंब ?
गढूळ पाणी झाले असता,
परावर्तित कसे होईल बिंब ?
प्रतिबिंबित ते करूनी बिंबा ..
आत्मपरिक्षण करण्याला ..
सहाय्य आपण करीत असतो..
बिंबाचा मळ धुवावयाला ..
खरेच जेधवा कमळ असते
नसतो चिखल वर माखलेला
चिखलात राहुनी 'अलिप्तपण' गुण
अंगभूत असे त्यास चिकटलेला
तळास कितीही चिखल असुनही ..
कमळास न लगे प्रतिबिंब काही..
राजकीय परी ते कमळ असता..
'कमळाचे' गुण नसती काही..
कागदी, बेगडी कमळ काही
हरिचरणी कुणी वाहात नाही
हे हिंदु-बंधूंनो, तारतम्य हे ..
सोडुन कधी चालायचे नाही ..
वन्दे मातरम् 🚩
~ पङ्कज 🪷
( ११.०५.२४)


.jpeg)
Comments
Post a Comment