कमळाच्या चिखलातील बेडूक

 




घड्याळ म्हणाले कमळाला, माझ्यात वाजला एक ... 
दिवस रात्र न घाबरता, लांब लाब बिनधास्त फेक ..

घड्याळ म्हणाले कमळाला, वाजायला आले दोन .. 
आमच्या दोन्ही काट्यांमध्ये झालाय बघ काटकोन ..

घड्याळ वदले कमळाला, वाजले गं पावणे तीन ..
हिंदुहिताच्या उडत्या फुग्याला चला मारूया पीन ..

घड्याळ मिश्किलपणे म्हणाले, वाजले साडे चार ... 
सगळी डबकी फिरून जमवू बेडूक चारसौ पार 

कमळ म्हणाले घड्याळाला, वाजले का रे पाच ?
नवीन नवीन लगीन आपलं, जरा तरी तू लाज !

घडाळ्याच्या कानी कमळ वदले, वाजले जेव्हा सहा ..
आमच्या डबक्यामधील चिखलात साबण लावून नहा 

कमळ स्वतःशीच कुजबुजले, वाजले जेव्हा सात ..
'घड्याळास भगवे गाजर दाखवून बुडविन मी चिखलात'

घड्याळ कमळाबाईस म्हणाले, वाजले जेव्हा आठ ..
'आपले मीलन लावेल पहा, तुझीच गं पार वाट ..'

कमळाने मग एक रचला कट, घड्याळात वाजता नऊ
घड्यालास बुडवून चिखलावरती, एकटेच तरून जाऊ..

'घड्याळात वाजला गजर, की तुतारी वाजते का पहा'
कमळ म्हणाले दचकून जेव्हा, घडाळ्यात वाजले दहा

घड्याळ लपून पहात होते, रात्रीचे वाजता अकरा ..
प्रत्यंचा कमळच कापत होते, हाती घेऊन सुरा ..

घड्याळ म्हणाले धनुष्याला, वाजले आपले बारा ..
चिखलात आता खोल रुतलो, सोडुन अपुल्या घरा ..

~ पङ्कज 🌷
(२०.०५.२४)

Comments

Popular Posts