लक्ष्मणौक्ति
लक्ष्मणौक्ती
हे जननी तू गे पाहुनी वेषभूषा ..
फसवेल तुजला ती केशरी रंगभूषा ..
जरीही खल कुणीही नागवू तूज पाही
तरी त्या ही रेष उल्लंघणे शक्य नाही ..
जरी पाहिले तू मनमोहकसे काही
तरी रेष तू ही उल्लंघणे योग्य नाही
कितीही जरी मुखी त्या असे रामनाम ..
तरीही असू शके त्या मनामाजी काम ..
जरी तू असशी गं अर्धांगिनी राघवाची
तरी ना तुज सुटे ती गती निजकर्माची
क्षणभर जरी सुटले सावधपण निजकृतीचे
तरीही होऊ शकेल संमोहीतचि मन तुझे
जरी जाहली चूक कर्माचिये ठायी ..
जरी असद्धेतुचा तव मनी लेश नाही ..
तरी भोगणे प्राप्त कर्माचा परिणाम
व्यावहारिक कर्माचा हा सिद्धांत ठाम
🪷🙏🏽
(१६.०५.२४)


.jpeg)
Comments
Post a Comment