बाणा !

 


बाणा !  


सुईस पाहुनी फुगा म्हणाला, 

"तुलना अपुली होईल का ?"

अजुनच फुलून मग तो वदला, 

" माझ्या पुढे तू दिसशील का ?"


हसूनी गाली, सुई म्हणाली, 

"लहानशी मी दिसे बिचारी,

कळ माझी तू काढू नको..

ताठ कण्याने, उभी ठाकता, 

जवळही माझ्या येऊ नको !"


"अणकुचिदार अन् ताठ कणा, 

गुणांचा या असता ठेवा,

कितीही मोठा असो फुगा मग,

निघेल त्याची क्षणात हवा !"


~ पङ्कज 🪷

( ०१.१०.२४ )

Comments

Popular Posts