कर्ता कारयिता चैव

( दुर्गदूर्गेश्वर रायगडाच्या वाडेवरील टिपलेले एक छायाचित्र )

कर्ता कारयिता चैव प्रेरकश्चानुमोदकः।

सुकृते दुष्कृते चापि चत्वार: समभागिन:॥

☘️

भावानुवाद:


कर्ता असो वा असो करविता 

प्रेरक वा असो अनुमोदक

सुकृत्ती वा दुष्कृत्ती लभतो

फळाचा तया समभाग ।


कर्ता करिता कायिक कार्य

करविताचि ठरे कारण त्याचे

प्रेरक पुरवी तयास प्रेरणा

सहाय्यक होती अनुमोदक ते ।


अनुमोदन कधी अभिव्यक्त असे

आणि कधी घडे मौन बाळगुनी

कर्माशी परी अनुबंध जोडतो 

अनुमोदन घडताचि तत्क्षणी ।


कर्माची परी गहन गती ती

कोणीही त्यातून न सुटती

मनःपटलावर परी तयाची

अदृश्य अशी अक्षरे उमटती ॥


~ पङ्कज (🪷)

१०.०१.२५

Comments

Popular Posts