गुढी उभारू धर्माची 🚩

गुढी पाडव्याच्या सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! सोबतची ही ताजी शब्दसुमने आपल्याला अवश्य आवडतील अशी आशा आहे 🚩🪷


गुढी उभारू धर्माची

मेढ तया सत्कर्माची 

मांगल्याचा कलश बांधू

दोरी धरुनी स्वधर्माची


राष्ट्राचे जो अहित करितो ..

अपुला, परका, कुणी असो तो

मुक-अनुमोदनही जो करितो

पापाचा तो समभागी होतो..


कितीही गर्दी असो जनांची ..

असेल जरी का ती स्वजनांची

स्वधर्म-पताका नभी फडकूदे

अमुच्या डोळां नित्य दिसूदे !


धर्म-गुढी जो उंच उभारी

रामची मग बळ देतसे करी

धर्माच्या मग लख्ख प्रकाशी

चालवी बोटां धरूनी श्रीहरी !



~ पङ्कज 🪷

( चैत्र शुद्ध प्रतिपदा. शालिवाहन शके १९४७. )

Comments

Popular Posts