गुन्हा कुणा-कुणाचा ?
गुन्ह्याचा कधी फक्त निषेध करायचा नसतो !
त्यामागील कारणाचा वेध घ्यायचा असतो !
गुन्हा घडतो अज्ञानापोटी, स्वार्थापोटी, लोभापोटी ..
गुन्हा घडतो मोहापोटी वा घडतो राजकारणापोटी..
कर्ता असो वा असो करविता, प्रेरक वा अनुमोदक
सुकृत्यी वा दुष्कृत्यी लभतो, फळाचा तया समभाग
कर्ता करिता कायिक कार्य करविताचि ठरे कारण त्याचे
प्रेरक पुरवी तयास प्रेरणा सहाय्यक होती अनुमोदक ते ।
अनुमोदन कधी अभिव्यक्त असे आणि कधी घडे मौन बाळगुनी
कर्माशी परी अनुबंध जोडतो अनुमोदन घडताचि तत्क्षणी ।
गुन्ह्याविरूद्ध शासनतंत्राने कधी विधिनिषेध करायचा नसतो..
संगीन गुन्ह्याचाही गुन्हेगारासोबत शिरच्छेद करायचा असतो
गुन्हा घडतो अंधाराच्या करण्याने, ज्योतीच्या न करण्याने..
ज्योतीखालील आंधार देखील ज्योतीलाच न दिसण्याने..
खालीच असून ज्योतीला तो का बरे दिसत नाही ?
ज्योतीच्याही कसे बरे तो इतका समीप राही ?
ज्योतीलाही कधी आरसा दाखवावा लागेल ना !
आरशातील किरणांनी मग अंधार दूर पळेल ना !
आरशामध्ये ज्योतीला मग स्वतःचेच मुख दिसेल ना !
सूर्याचा तिज असे वारसा, हे तिचे तिलाच उमजेल ना !
~ 🪷
( २३.०४.२५ )
.jpeg)

.jpeg)
Comments
Post a Comment